Hathras News चिमुकलीची प्रकृती गंभीर | मामानेच केला दीड वर्षाच्या भाचीवर बलात्कार

211

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचार व खून प्रकरणाने सारा देश ढवळून निघाला होता. त्यानंतर आता हाथरस पुन्हा हादरले आहे.

येथील ठाणा चंदपा भागातील एका खेड्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 

मामानेच आपल्या फक्त दीड वर्षीय भाचीवर पाशवी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर त्या चिमुकलीची प्रकृती गंभीर बनली आहे. 

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी चिमुकलीची प्रकृती गंभीर असलेली पाहून उपचारासाठी हाथरसच्या जिल्हा रूग्णालयात तिला हलविले.

मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडत चाललेली पाहून तीला जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अलीगड येथील जेएन मेडिकल कॉलेजच्या उच्च केंद्रात दाखल करण्याच्या सुचना केल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, हाथरसच्या चंदपा भागातील गावात दीड वर्षाच्या त्या चिमुकलीला घेऊन मुलीचा मामा घरातून फिरण्यासाठी बाहेर पडला.

तो त्या चिमुकलीला घेऊन जंगलाच्या मध्यभागी असलेल्या निर्जन ट्यूबवेलवर गेला. त्यानंतर घरात त्या चिमुकलीचा शोध सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीचा कुटुंबीयांनी शोध सुरू ठेवला.

परंतु या कालावधीत ती कोठेही सापडली नाही. रात्री उशिरा त्या चिमुकलीच्या मामाने त्या निष्पाप बाळाला घेऊन घरी परतला होता.

घरी परतल्यानंतर जेंव्हा त्या चिमुकलीच्या आईने बाळाला आपल्याकडे देण्याची मागणी केली तेंव्हा त्याने बाळाला आईकडे दिले नाही.

त्यावर आईने आपल्या बाळाला त्या नराधमाकडून हिसकावून घेतले. हिसकावून घेतल्यानंतर ते बाळ रडत होते. त्यानंतर त्या चिमुकलीची अवस्था पाहून सर्व कुटुंब आश्चर्यचकित झाले. बाळाची प्रकृती चिंताजनक झाल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here