शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ढोंग : देवेंद्र फडणवीस

151

भंडारा : आजाद मैदानावर आलेल्या आदिवासींना डाव्या पक्षांनी दिशाभूल करून आणलं आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेते करीत आहेत.

आजाद मैदानातील मंचावर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा म्हणजे काँग्रेसचे ढोंग आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आज मुंबईतील आझाद मैदानात एकत्र आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके महिने झालेत पण तेव्हा कोणतंही आंदोलन झालं नाही.

आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगीपणा करत असून शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, काँग्रेसनं आपल्या २०१९च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर बाजार समिती रद्द करु, असं का म्हटलं होतं, याचं उत्तर दिलं पाहिजे,’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांना सर्व सत्य माहित आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून करार शेती आहे, हे पवार जाणतात. म्हणूनच पवारांनी आजवर कधीच शेती कायद्यांचा उघड विरोध केलेला नाही.

ते फक्त असे करायला हवे होते, तसे करायला हवे होते असे म्हणतात, अशी बोचरी टीका भाजप नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here