मुंबई : मोदी सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकल रॅली आयोजित केली होती.
इंधनदरवाढीविरोधात अधिवेशन सुरु होण्याआधी करण्याआधी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले.
या सायकल रॅलीविरोधात फडणवीसांकडून टीका करण्यात आली आहे. कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याटी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.
फडणवीस म्हणाले, सध्या देशात कॉंग्रेसची अवस्था चांगली नाही. विरोधी पक्षांची जागा त्यांना घेता येत नाही. हा सायकल मोर्चा निव्वळ मीडिया इव्हेंट आहे. विरोधी पक्षांची स्पेस त्यांनी घेता येणार नाही.
कॉंग्रेसची अवस्था चांगली नाही. केविलवणा आवस्था असल्याने त्यांनी इंव्हेट करावा लागत आहे. कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी, वीजबीलावरून सरकारला घेरणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यूवरुन आरोप प्रत्यारोप होत असताना भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरुन सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सवाल विचारलेत.
पूजा चव्हाण मृत्यूबाबत गलिच्छ राजकारण करणारे, डेलकर यांच्या आत्महत्येवर मौन का बाळगतात असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणालेस, कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्याची स्थिती केवलवाणी होती. मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ येई नये. मोहन डेलकर आत्महत्येची चौकशी झालीच पाहिजे.
फडणवीस म्हणाले, वरळीत जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे जास्तच मनावर घेतात म्हणून नाईट लाईफ सुरू राहावी हे त्यांनी मनावर घेतले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोशल डिस्टन्सिंग कुठेचं दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग हे फक्त शिवजयंतीला आहे नाईटला नाही.