काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्विटरने मोठा धक्का दिला आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील अत्याचार बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता.
भाजपकडूनही त्यावर आक्षेप घेण्यात आला होता, तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्याने या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती.
त्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवले होते.
मात्र, आता त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता.
विनीत जिंदल या वकिलाने त्याबद्दल आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे.
त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे जिंदल यांनी तक्रारीत म्हटले आहे.