‘कुली नं. १’वरुन ट्रोल करणाऱ्यांना वरुण धवनचे सडेतोड उत्तर

159
collie no1

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खानचा ‘कुली नं. १’ हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.

हा चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अनेकांनी वरुण धवनला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

आता वरुणने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. नुकताच वरुण धवनने बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये वरुणने ‘कुली नं. १’ चित्रपट प्रदर्शित होताच ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

माझ्यासाठी चित्रपटात काम करणे म्हणजे प्रेक्षकांना आनंदी करण्यासारखे आहे. पण तुमचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक ज्या प्रतिक्रिया देतात त्या फार महत्त्वाच्या असतात.

तुमच्याकडे त्या सहन करण्यासाठी सहनशक्ती असायला हवी. मी नेहमी माझ्या कामामुळे आनंदी असतो’ असे वरुण म्हणाला.

 

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता.

चित्रपट प्रदर्शित होताच अनेकांनी दोन्ही चित्रपटांची तुलना करण्यास सुरुवात केली. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

वरुण आणि सारा सोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव या कलाकरांनी देखील भूमिका साकारल्या. हा चित्रपट प्रदर्शित होताच IMDbने चित्रपटाला १.४ इतके रेटींग दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here