Coroana Update | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची जास्त चिंता करू नका : डॉ. गुलेरिया

172
Dr Guleria

नवी दिल्ली : कोरोना विषाणू याआधीही अनेकवेळा म्युटेट झाला आहे म्हणजे त्याने आपले रुप बदलले आहे. त्यामुळे नव्या स्ट्रेनची लोकांनी जास्त चिंता करू नये, असा सल्‍ला एम्स रुग्णालयाचे संचालक आणि कोविड प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

आपत्कालीन स्थितीसाठी जी लस वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे, ती नव्या स्ट्रेनवर देखील प्रभावशाली ठरेल, असा विश्‍वास गुलेरिया यांनी व्यक्‍त केला.

एका अंदाजानुसार एका महिन्यात कोरोना विषाणू दोनवेळा म्युटेट होतो, असे सांगून गुलेरिया पुढे म्हणाले की, म्युटेशनचे लक्षण आणि इलाजाच्या रणनीतीमध्ये बदल करण्याची काही आवश्यकता नाही.

सध्या तरी नवीन लस शोधण्याची गरज नाही. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत बाजारात सहा ते सात लसी उपलब्ध असतील. फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसाठी ही लस मोफत दिली जाणार असून त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

सध्या विकसित केली जात असलेली लस ब्रिटनमधून आलेल्या स्ट्रेनवर सुध्दा परिणामकारक ठरु शकते. पुढील सहा ते आठ महिने कोरोना विषाणूविरुध्द लढा देण्यासाठी महत्वाचे आहेत.

याचे कारण म्हणजे आता कोरोनामुळे मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या कमी आहे तसेच रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. नवीन स्ट्रेन आधीच्या विषाणूपेक्षा जास्त धोकादायक असला तरी त्यामुळे रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची गरज नाही. या स्ट्रेनमुळे जास्त लोक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता नाही.

गेल्या दहा महिन्यापासून अनेकदा विषाणूचे म्युटेशर झाले आहे, असे सांगत डॉ. गुलेरिया म्हणाले की, जर गरज पडली तर नव्या स्ट्रेनवर औषध कंपन्या नवीन लस तयार करु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here