Corona 2nd Wave Good News : कोरोनाची दुसरी लाट ज्या वेगाने पसरली, त्याच वेगाने ती ओसरणार | संशोधकांचा दिलासादायक दावा

1032
COVID IN MAHARASHTRA

Corona 2nd Wave Study  | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. दररोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

आता ही रुग्णसंख्या वाढ सर्व स्तरांवर दहशतीचे वातावरण निर्माण करु लागली आहे. या भीतीदायक तणावाच्या वातावरणात एक अत्यंक महत्त्वाची व दिलासा माहिती समोर आली आहे.

Credit Suisse ने केलेल्या एका संशोधनातू ही बाब समोर आली आहे की जितक्या वेगाने कोरोनाची दुसरी लाट देशात पसरली आहे तितक्याच वेगाने ही लाट ओसण्याचीही दाट शक्यता आहे.

सदर संशोधनानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतीय लोकसंख्येतील 40 टक्के नागरिकांमध्ये कोरोना च्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतील.

मागील वर्षी डिसेंबर महिना अखेरीस देशातील 21 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस हे प्रमाण वाढत जाऊन यामध्ये आणखी 7 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत जवळपास 12 टक्के जनतेमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील 40 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यापासून दूर असेल.

वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन

देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता.

त्यामध्ये 24 टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन सापडला असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here