Corona Care | कोरोना रुग्णास ‘ही’ लक्षणे दिसल्यास हॉस्पिटलमध्ये जावे !

896

भारतात १३ लाख ८६ हजार ८६ कोरोना एक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील लक्षणे दिसत नसलेल्या अथवा कमी तीव्रतेचा कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

यामुळे भारतात सरकारी यंत्रणेचा भर कोरोना रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यावर आहे. जे छोट्या घरामुळे होम क्वारंटाइन होऊ शकत नाही अशांना संस्थात्ममक क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे.

क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांपैकी एखाद्याची तब्येत बिघडली तर संबंधित रुग्ण आणि त्याचे नातलग एकदम घाबरतात. हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतात. पण प्रत्येकवेळी असे करण्याची आवश्यकता नाही.

क्वारंटाइन असलेल्याला विशिष्ट लक्षणे आढळली तरच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

अन्यथा क्वारंटाइनमध्येच डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू ठेवावे. तब्येतीतले चढउतार रुग्णाच्या डॉक्टरांना वेळोवेळी कळवणे अत्यावश्यक आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निर्णय घेणे सोपे पडते.

याच कारणामुळे रुग्ण आणि त्याच्या नातलगांनी कोरोना संदर्भातील माहिती लपवण्याऐवजी डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.

प्रत्येक कोरोना रुग्णाची सरकारी मेडिकल टीम फोन करुन अथवा प्रत्यक्ष भेटून नियमित विचारपूस करते. चौकशीला येणाऱ्या मेडिकल टीमपासून तब्येतीची खरी माहिती लपवू नये.

यामुळे लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळते. लक्षात ठेवा क्वारंटाइन रुग्णाच्या बाबतीत विशिष्ट लक्षणे दिसली तरच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते.

एरवी वैद्यकीय मार्गदर्शनात क्वारंटाइन राहून उपचार घेतले तरी रुग्ण बरा होऊ शकतो. उपचार वेळेवर केले तर कोरोना हा संसर्गजन्य आजार बरा होऊ शकतो.

यामुळे घाबरण्यापेक्षा वास्तवाचे भान बाळगा आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तब्येतीबाबत खरी माहिती द्या.

नियमित उपचार घेत असलेल्या व्यक्तींच्या तब्येतीत अचानक चढउतार दिसू शकतात.

यामुळे तब्येतीत बदल जाणवल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे हिताचे आहे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कोरोनामुळे जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

एखाद्या कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे अथवा त्याचा श्वास गुदमरतोय किंवा त्याला वारंवार ताप येत आहे.

अंग तापाने फणफणत आहे. तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णाला असह्य डोकेदुखीचा त्रास झाला.

लहान आवाजानेही त्याची मनःशांती ढासळत असेल तर त्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे.

कोरोना रुग्णाला चक्कर आली अथवा रुग्ण बेशुद्ध पडला तर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे. एरवी वैद्यकीय देखरेखीत क्वारंटाइन राहिलेली कोरोनाबाधीत व्यक्ती पण बरी होऊ शकते.

तर कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा!

  • श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत आहे, गुदरमरल्यासारखे वाटत आहे.
  • वारंवार ताप येत आहे आणि अंग सतत तापाने फणफणत आहे.
  • असह्य डोकेदुखीचा त्रास झाला, लहान आवाजानेही मनःशांती ढासळू लागली.
  • चक्कर आली अथवा शुद्ध हरपली (बेशुद्ध झाल्यास)
  • रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अथवा एखादा जुना आजार असलेल्या व्यक्तीची तब्येत ढासळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here