कोरोना कमी झाला आणि महिला डॉक्टरांनी पीपीई किटवर डान्स करून आनंद साजरा केला, डान्सचा व्हिडीओ व्हायरल

583

बीड : अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होतो आहे.

यात चार महिला डॉक्टर गाण्याचा तालावर थिरकताना दिसत आहे. अंबाजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली होती.

यामुळे अनेक डॉक्टर आणि परिचारिकांना सलग 18-18 तास ड्युटी करावी लागली. मात्र आता अंबेजोगाईत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडासा विसावा मिळत आहे.

जिथे10 दिवसापूर्वी अंबेजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 पेक्षा अधिक रुग्ण आढळत होते, मात्र ती संख्या आता 50 पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

त्यामुळेच मागील महिना भरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर आनंद व्यक्त केला.

या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here