Corona Good News | आणखी एका कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCI ची परवानगी

317

डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी लॅबने बनवलेले Drug 2-deoxy-D-Glucose (2-DG) या कोरोना प्रतिबंधक औषधाला देशात आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी डीजीसीआयने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे कोविड नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये या आणखी एका प्रयत्नांची भर पडली आहे.

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवळी या महामारीशी लढण्यासाठी तयारी करण्याचे विविध घटकांना आवाहन केले होते.

▪️ तेव्हा डीआरडीओने एप्रिल 2020 मध्ये 2-DG य औषधावर काम करायला सुरुवात केली होती.

▪️ त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान आढळून आले की, हे औषध SARS-Cov-2 कोविड-19 या आजारावर प्रभावीपणे काम करते.

▪️ दरम्यान, या औषधाच्या फेज-2 मधील क्लिनिकल ट्रायलला मे 2020 मध्ये परवानगी दिली होती.

▪️ त्यानंतर मे-ऑक्टोबर 2020 मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-2 च्या ट्रायलला सुरुवात केली होती.

▪️ फेज-2 ची ट्रायल 6 रुग्णालयांमध्ये घेण्यात आली, यामध्ये 110 रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here