Corona Good News | दोन दिवसात उपलब्ध होणार अँटी कोरोना औषधी : DRDO ची माहिती

330

ऑक्सिजनचा पुरवठा कमी असला तरी या औषधांनी रुग्णाचा बचाव करणे शक्य होणार असल्याचे DRDO ने सांगितले आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. अनेक राज्यात तर ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. त्याबद्दल सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

कोरोनाच्या या विपरीत परिस्थितीत नागरिकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. डीआरडीओने कोरोनावर तयार केलेल्या नव्या औषधांच्या आपात्कालिन वापराला परवानगी दिली आहे. 2 डेओक्सी-डी-ग्लुकोज असे या औषधाचं नाव आहे. या औषधांने कोरोना रुग्ण लवकर बरे होतात, असे सांगितलं जात आहे.

या औषधांमुळे बाहेरुन ऑक्सिजन कमी प्रमाणात घेतला तरी चालू शकतो. 11 ते 12 म्हणजे दोन दिवसात हे औषध बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती समोर आली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष सतिश रेड्डी यांनी असा दावा केला आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात या औषधाचे 10 हजार डोस बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र सरसकट या औषधांचे सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलं जावे असे सांगितले जात आहे.

या औषधांमुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला 2 ते 3 दिवसात ऑक्सिजन सपोर्टवरुन काढता येऊ शकतं. त्यामुळे लवकरच हे औषध रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल, असंही रेड्डी यांनी सांगितले.

आजपर्यंत तीन वेळा या औषधाच्या मानवी चाचण्या करण्यात आल्याचे डीआरडीओने सांगितले. देशातील 11 रुग्णालयांमध्ये 110 कोरोना रुग्णांवर या औषधांच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी पार पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here