Corona New Strain | कोरोनाचा नवीन स्ट्रेन आल्याने लक्षणे बदलली, दुर्लक्ष करू नका !

531
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

आज आपल्या देशात जगातील सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन आल्याने लक्षणे बदलली आहेत.

आपल्याला कोरोनाची सर्दी-खोकला, ताप, घसा खवखणे आदी लक्षणं माहित आहेत, मात्र याव्यतिरिक्त इतर काय लक्षणं आहेत, समजून घेऊया!

● डोळे लाल होणे : अधिक वेळ कॉम्प्युटर, मोबाईल स्क्रीन पाहिल्याने देखील डोळे लाल होतात, मात्र कोरोना संसर्ग झाल्यास डोळे लाल होण्यासह डोकेदुखी आणि ताप ही लक्षणंही दिसून येतात.

● श्वासाचा त्रास : श्वास घेण्यास त्रास होणं ही कोरोनाबाबत गंभीर समस्या आहे. छातीत जडपणा जाणवणे हे कोरोना संक्रमणाचे संकेत ठरू शकतात.

● थकवा : रोजच्या कामाचा थकवा वेगळा असतो, मात्र अतिशय थकवा येणे हेसुद्धा कोरोनाच लक्षण असू शकते. जास्त दिवस कायम थकवा जाणवल्यास किंवा शरीर वेदना देत असल्यास हे कोरोनाचे संकेत असू शकतात.

● लूज मोशन : सतत दोन-तीन ‍दिवस लूज मोशन होणे हे देखील संकेत असू शकतात. पचनसंस्थेवर परिणाम होऊन डायरिया, मळमळणे, भूक न लागणे अशी लक्षणं संकेत असू शकतात.

● मेमरी डिसऑर्डर : स्मरणशक्तीवर परिणाम होणे अर्थात एकाग्रतेची कमी, अस्वस्थ जाणवणे, निर्णय क्षमतेत गोंधळ, विसर पडणे अशी काही लक्षणे कोरोनाच्या संसर्गामुळेही असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here