राज्यात कोरोनाचा उद्रेक | 24 तासात 6 हजार 112 नवे रुग्ण, 44 बाधितांचा मृत्यू

179

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. 

तसेच गेल्या 24 तासात 44 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यार राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 317310 299848 11437
पुणे 398407 381811 8020
ठाणे 274762 263731 5774
पालघर 48528 47125 939
रायगड 69825 67494 1593
रत्नागिरी 11885 11254 411
सिंधुदुर्ग 6560 6142 177
सातारा 57795 55049 1836
सांगली 51132 48859 1790
नाशिक 124754 121457 2029
अहमदनगर 73696 71631 1119
धुळे 16454 15927 337
जळगाव 14438 9767 611
नंदूरबार 923 515 43
सोलापूर 57119 54583 1833
कोल्हापूर 49429 47561 1674
औरंगाबाद 50576 48329 1255
जालना 13921 13305 370
हिंगोली 4522 4286 100
परभणी 1028 460 39
लातूर 25101 23878 695
उस्मानाबाद 17806 17017 559
बीड 18657 17720 558
नांदेड 22721 21705 679
अकोला 13327 11746 373
अमरावती 28629 23747 425
यवतमाळ 16940 15527 466
बुलडाणा 16257 14800 254
वाशिम 7751 7285 161
नागपूर 143337 133841 3459
वर्धा 11832 11047 304
भंडारा 13744 13242 313
गोंदिया 14469 14196 173
चंद्रपूर 24439 23668 410
गडचिरोली 8928 8751 99
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 146 0 85
एकूण 2087632 1989963 51713

 

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण 44 हजार 765 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

सध्या राज्यात 2 लाख 24 हजार 087 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 588 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here