कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याने बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. मात्र अशा नकारात्मक वातारणातही रुग्णाचे आणि नातेवाईकांचे मनोबल वाढविणारी एक सकारात्मक बातमी लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे.
● 105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. धेनू उमाजी चव्हाण (वय 105) आणि मोताबाई चव्हाण (वय 95 दोघही रा. काटगाव तांडा, कृष्णानगर, जि. लातूर) असे कोरोनावर मात केलेल्या दाम्पत्यांचे नाव आहे.
कोरोनाच्या या भयानक स्थितीतही डॉक्टरांच्या प्रयत्नाने व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या विषाणूला परतवून लावू शकतो, हे या आजी- आजोबांनी सिद्ध करून दाखवले आहे.