मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असताना देशाच आणि राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे.
त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
कोवॅक्सिन लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला येत्या 6 महिन्यात 85 लाख डोस देण्याची तयारी दर्शवली
आहे.
लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पत्र पाठवले होते.
याला उत्तर देताना भारत बायोटेकने येत्या
सहा महिन्यात महाराष्ट्राला कोरोना लसीचे 85 लाख डोस देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
मात्र यासाठी त्यांनी अॅडव्हान्स पेमेंटची
मागणी केली आहे. 600 रुपये प्रति डोस
यानुसार दर आकारले जाणार आहेत.