Corona Second Wave Good News | कोरोनाची दुसरी लाट कमकुवत कधी होणार? याबाबत तज्ज्ञांकडून खुलासा

672

मुंबई : देशात व राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर विजयराघवन म्हणाले की, या महिन्याच्या अखेरपर्यंत देशात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीत प्रोफेसरानी गुरूवारी सांगितले की कोरोनाचा असा कोणताही व्हेरिएंट नाही ज्यावर लस काम करत नाही.

सोबतच हा व्हायरस वेगाने पसरवण्यामागे केवळ एकच नव्हे तर अनेक कारणे आहेत. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या खूप वाढली आहे.

गुरूवारी रेकॉर्डब्रेक आकडेवारी

देशात गुरूवारी गेल्या २४ तासांता कोरोनाबाधितांची नवे ३,१४,८३५ प्रकरणे समोर आली. ही महामारी सुरू झाल्यानंतर जगातील एका दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाने बाधित होण्याची संख्या सर्वाधिक आहे.

तर गेल्या २४ तासांत २,१०४ लोकांचा मृत्यू झाला. प्रोफेसर म्हणाले, देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आली आहे तो चिंतेचा विषय आहे.

सध्या या व्हायरसचा पीक पिरियड सुरू आहे. हा कालावधी लक्षात घेतला असता यासाठी १२ आठवड्यांचा वेळ लागतो. ही लाट कमकुवत होण्यास थोडा वेळ लागेल. पुढच्या महिन्याच्या सुरूवातीस आणि या महिन्याच्या अखेरीस ही लाट कमकुवत ठरू शकते.

आपण काय केले पाहिजे?

ते पुढे म्हणाले, देशात मिळालेले कोरोनाचे नवे म्युटेंट पाहता आपल्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे. सोशल डिन्स्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. मोठ्या प्रमाणात लसीकरण केले पाहिजे.

१ मेपासन १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण

देशात वाढत्या कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण अभियान सुरू करत आहे. आता १मेपासून १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जाणार आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग अडकत आहे. यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांचे म्हणणे आहे की राजधानीमध्ये ६५ टक्के कोरोनाबाधित रुग्ण हे तरूण वर्गातील आहेत. याच वयोगटातील व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर पडत असतात.

लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया

 • आरोग्य सेतू अॅप अथवा कोविन अॅपवरुन नोंदणी करता येईल. तसेच https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकवरुही नोंदणी करता येईल; त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 • स्वतःचा दहा आकडी मोबाइल क्रमांक टाकून गेट ओटीपी करा.
 • मोबाइलवर ओटीपीचा मेसेज येताच तो ओटीपी येताच व्हेरिफाय या बटणाला क्लिक करा.
 • आता एक फॉर्म येईल तो व्यवस्थित भरा.
 • आपण आधार क्रमांक अथवा पॅन क्रमांक अथवा ड्रायव्हिंग लायसन्स अथवा पासपोर्ट अथवा पेंशन पासबुक अथवा एनपीआर स्मार्ट कार्ड अथवा व्होटर आयडी यापैकी कोणताही एक दस्तऐवज पुरावा म्हणून सादर करणार असल्याचे जाहीर करा
 • खालच्या रकान्यात संबंधित क्रमांक टाइप करा.
 • आपले नाव व्यवस्थित नमूद करा नंतर मेल, फिमेल, अदर्स यातून योग्य तो पर्याय निवडा.
 • आपल्या परिसराचा पीनकोड क्रमांक टाकून सर्च करा जेणेकरुन जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळेल. नंतर संबंधित केंद्र निवडा; यामुळे केंद्रावर नोंदणी करण्याचा वेळ वाचेल.
 • नोंदणी झाल्यावर लस कधी घेणार तो दिवस आणि वेळ निवडा. यामुळे लसीकरण केंद्रावर जास्त वेळ वाया जाणार नाही.
 • पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी कधी यायचे ते विचारा आणि पहिला डोस घेतल्याची पावती घेऊन जपून ठेवा.
 • दुसरा डोस घेतल्यावर सर्टिफिकेट मिळते. ते जपून ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here