राज्यात कोरोनाचा धोका कायम असून रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसते नाही. बुधवारी राज्यात 63 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते.
● गुरुवारी हा आकडा पुन्हा वाढलेला दिसला. गुरुवारी 66 हजार 159 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45 लाख 39 हजार 553 झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 70 हजार 301 वर पोहोचली आहे.
● दिलासादायकबाब म्हणजे राज्यात आज 68 हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 83.69 टक्क्यांवर आला आहे.
● राज्य सरकारने आदेश काढला असून त्यानुसार आत्ता राज्यात लागू असलेले निर्बंध 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत
● कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे
● राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन करा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
● राज्यात 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण 15 मे नंतरच; जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याचा इशारा
● कोरोना विषाणूसाठी पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांना Mask घालण्याची गरज नाही; अमेरिकन प्रशासनाचा मोठा निर्णय
● पुणे विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार ऑनलाइन; अभ्यास मंडळाचा निर्णय
● मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा
● माझं वर्षभराचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार- बाळासाहेब थोरात
● गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यं, केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या कंटेनमेंट निर्देशांचे 31 मे पर्यंत पालन करण्याचे निर्देश
● नेटफ्लिक्सने लॉन्च केले ‘Play Something’ फिचर; युजर्सचा कल पाहून दाखवणार आवडीचे प्रोग्राम
● पृथ्वी शॉ ची जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने कोलकाताचा 7 विकेटने केला पराभव
● स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार
Osmanabad News
● उमरगा तालुक्यात एका दिवसात 73 पॉझिटिव्ह; उपचारादरम्यान 8 जणांचा मृत्यू, ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता
● सुविधांचा तुटवडा, 25 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी परजिल्ह्यात; जिल्ह्यात उपचारासाठी बेड शिल्लक नसल्याचेही कारण; मोकाट नागरिकांमध्ये अद्यापही बेशिस्तपणा
● खरिपाचा आढावा; एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या; पालकमंत्री गडाख यांच्या सूचना; गेल्या वर्षी 650, यावेळी 1200 कोटींच्या कर्जवाटपाला मंजुरी, बियाणे-खत वाटपाचे आदेश
Latur News
● अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कोविड हेल्थ सेंटर सुरु होत आहे.
● सलग सहा दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक; रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी 839 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत
● औषधी बाहेरुन आणायला लावली; वैद्यकीय अधिकारी निलंबित; निलंगा येथे रुग्णांना ठराविक मेडीकल दूकानातून औषध आणण्यासाठी चिठ्ठी देत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती