Corona Update : राज्यात दिवसभरात ३१ हजार ९६४ जण कोरोनामुक्त

129

राज्यात मागील (दि.29) २४ तासात राज्यात २० हजार २९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३१ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासात ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५७३ आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे.

दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here