राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा चढता आलेख वाढतच आहे.आज दिवसभरात राज्यात 67 हजार 16 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.
तर 568 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्याचा मृत्यू दर 1.53 टक्के एवढा आहे.
तसेच आज 62 हजार 298 रुग्ण कोरोनातून बरेदेखील झालेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 33,30,747 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 टक्के एवढे झाले आहे.