आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 50 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 25 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेले राज्यातील कोरोना मृत्यू आज पुन्हा एकदा वाढल्याचे दिसले. आज राज्यात 111 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.58 इतका झाला आहे.
आज राज्यात 5,600 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 18,32,176 इतकी झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 88,537 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज राज्यात दिवसभरात 111 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 47,357 वर पोहोचला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 37, पुणे 20,नाशिक 17, कोल्हापूर 5, औरंगाबाद 5, लातूर मंडळ 7, अकोला मंडळ 1 , नागपूर 18 व इतर राज्य 1 येथील मृत्यूंचा समावेश आहे.
गेल्या महिन्याभरात राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 50 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 25 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 36 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.58 % एवढा आहे.
Mazagon Dock Recruitment 2020 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड नोकर भरती
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,09,89,496 नमुन्यांपैकी 18,32,176 ( 16.67 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,47,791 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,073 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.