Corona Update : भारतात डेल्टाचे नवे वेरिएंट अधिक धोकादायक; एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करणार

125

मुंबई : भारत कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात होरपळून निघत आहे. देशातील विविध भागात अजूनही लॉकडाऊन आहे, तर काही ठिकाणी शिथिल करण्यात आले आहे.

या दरम्यान देशाची चिंता वाढविणाऱ्या कोरोनाच्या अधिक संसर्गजन्य वेरिएंट डेल्टाचे नवे रूप समोर आले आहे. याला AY.1 किंवा डेल्टा+ असे नाव देण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा वेरिएंट मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करतो. हे औषध कोरोनाच्या विरूद्ध एक चांगले आणि प्रभावी मानले जात होते.

भारतात पहिल्यांदा नोंदवला गेलेला डेल्टा वेरिएंट फार धोकादायक ठरला होता. आता तज्ञांच्या मते, डेल्टा वेरियंटने पुन्हा एकदा म्युटेशन करून AY.1 किंवा डेल्टा+ या म्यूटेंटमध्ये स्वतःला बदलले आहे.

हा वेरिएंट मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करतो जो कोरोनाबाधित रूग्णांसाठी फार धोकादायक ठरू शकणार आहे.

गेल्या शुक्रवारपर्यंतच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे, भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा+चे 6 प्रकरण समोर आली होती. दिल्ली आणि जेनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ फिजीशियन आणि कॉम्प्यूटेशनल बायोलॉजिस्ट डॉ. विनोद स्कारिया म्हणाले, K417N बद्दल सर्वात महत्वाची म्हणजे म्यूटेंट मोनोक्लोनल एंटीबॉडी Casirivimab आणि Imdevimab देखील प्रभावी ठरू शकत नाहीत.

सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन के आदेशानुसार, देशातील कोविड-19 च्या उपचारात या कॉकटेलच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. K417N म्यूटेशनची वेरिएंट फ्रीक्वेंसी भारतात खूप कमी आहे.

डॉ. स्कारिया यांनी नव्या म्यूटेंटला डेल्टा+ नाव देत जसे जसे नवीन म्यूटेशन होईल तसा डेल्टा विकसीत होत जाईल, हे समजणे आव्हानात्मक आहे, असे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here