Corona Vaccine Protection | कोरोना लस तुम्हाला किती काळासाठी सुरक्षा देऊ शकते?

738

सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) कहर केला आहे. त्यासाठी देशभर लसीकरण वेगाने केले जात आहे. देशातील सर्व वयोगटातील व्यक्तीला लसीकरण केले जाणार आहे. १ मे पासून तर १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना लस दिली जाणार आहे.

यासोबतच अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व लसीकरण करणे या दोन पातळीवर सरकार काम करीत आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे आणि त्यासाठी किती अतिरिक्त डोसची (Additional Doses) गरज भासू शकते याची पडताळणी करण्यावरही संशोधकांचा भर आहे.

कारण कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (New Verient) संशोधकांना आश्चर्यचकित केले आहे. या स्थितीत लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे, परंतु लशीमुळे (Vaccine) किती कालावधीपर्यंत बचाव होऊ शकेल,असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

काही जणांच्या मते ही लस वर्षभर, तर काही जणांच्या मते सहा महिने प्रभावी राहील असे म्हटले जात आहे. कोरोना लसीच्या बाबतीत तज्ञांच्या दावे-प्रतिदावे सामान्य माणसाला पूर्णपणे गोंधळून टाकत आहेत.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील लस संशोधक डेबोरा फुलर यांनी सांगितले की, जेव्हा लशींवर अभ्यास केला जातो, तेव्हाच अशाच प्रकारची माहिती उपलब्ध होते.

आम्हाला लस घेतलेल्या लोकांचा अभ्यास करावा लागतो आणि हे देखील पाहावे लागते की कोणत्या वेळी लोकांना पुन्हा विषाणूची लागण होत आहे.

एवढा काळ ‘लस’ प्रभावी ठरेल

आतापर्यंत सुरू असलेल्या फायझर लशीच्या (Pfizer Vaccine) ट्रायलवरून असे दिसते की ही लस किमान 6 महिन्यांपर्यंत प्रभावी ठरू शकते।परंतु अधिक काळ ही लस प्रभावी ठरू शकेल अशी चिन्हे देखील दिसत आहेत.

मॉडर्ना कंपनीची लस (Moderna Vaccine) घेतलेल्या लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर विषाणूशी लढणाऱ्या अँटीबॉडी (Antibody) निश्चित स्तरावर पोहोचण्यासाठी 6 महिने लागतात.

पण अँटीबॉडीजमुळे सर्वकाही स्पष्ट होत नाही. बाह्य विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिकार यंत्रणेमध्ये बी आणि टी पेशी नावाच्या संरक्षणाची दुसरी भिंत देखील असते.

अँटीबॉडीजचा स्तर कमी झाल्यानंतरही यापैकी काही पेशी (Cells) शिल्लक राहतात. जर भविष्यात परत विषाणूचा संसर्ग झाला तर या पेशी त्यांचे कार्य वेगात सुरू करतात.

जर बी आणि टी पेशी रोगाला थोपवू शकल्या नाहीत तर त्या रोगास गंभीर बनवतात, परंतु कोरोना काळात या पेशी अशी भूमिका कशी आणि किती काळ निभावू शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आयुष्यभर लस प्रभावी ठरू शकेल ?

मेरीलँड युनिव्हर्सिटीतील संशोधक कॅथलीन नेयुजिल यांनी सांगितले, कोरोना प्रतिबंधक लस किमान 1 वर्ष प्रभावी ठरणे आवश्यक आहे. परंतु गोवर लशीप्रमाणे ती आयुष्यभर प्रभावी ठरू शकेल असे नाही ही एक मोठी व्यापक गोष्ट आहे.

अतिरिक्त डोस घेण्यामागे व्हायरसचा नवा व्हेरियंट हे कारण असू शकते. सध्या दिल्या जाणाऱ्या सर्व लशी कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनवर (Spike Protein) काम करतात.

इमोरी लसीकरण केंद्राचे मेहुल सुथार यांनी सांगितले की, विषाणू जर सातत्याने जास्त प्रमाणात म्युटेट झाला तर अधिक प्रभावी ठरण्यासाठी आपल्याला लस देखील अपडेट करावी लागेल. आतापर्यंतच्या लशी या कोरोनाच्या सर्व व्हेरियंटवर प्रभावी ठरताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here