Corona Virus Mutant : कोरोना लसीकरणानंतर आणखी धोकादायक होईल? भारतीय शास्त्रज्ञांनी ‘सत्य’ सांगितले, जाणून घ्या!

957
coroana

कोविड-19 चे व्हेरिएंट कमी करण्याचा एकमात्र उपाय व्हॅक्सीनेशन वाढविणे आहे.

नवी दिल्ली : फ्रान्सचे वायरॉलॉजिस्ट आणि नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टॅग्नियर यांनी कोरोना व्हॅक्सीन आणि व्हेरिएंटबाबत एक वक्तव्य केले होते जे सध्या खुप चर्चेत आहे.

ल्यूक यांनी दावा केला होता की, व्हॅक्सीनमुळे तयार झालेली अँटीबॉडी कोरोनाच्या नव-नवीन व्हेरिएंटला जन्म देईल आणि यामुळे महामारी आणखी धोकादायक होईल.

मात्र, ल्यूक यांचा दावा तमाम डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांनी फेटाळून लावला आहे. भारताच्या प्रसिद्ध व्हॅक्सीन शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी सुद्धा ल्यूक यांचा हा दावा अशास्त्रीय असल्याचे म्हटले आहे.

गगनदीप यांनी म्हटले की, कोविड-19 चे व्हेरिएंट कमी करण्याचा एकमात्र उपाय व्हॅक्सीनेशन वाढविणे आहे. मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशनला चुकीचे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या तथ्यहीन आहे.

कांग यांनी म्हटले की, ल्यूक यांनी हे म्हटले नाही की, व्हॅक्सीन घेतलेले सर्व लोक दोन वर्षात मरतील. काही लोक सोशल मीडियावर दावा करीत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहे.

त्यांनी म्हटले होते की, व्हॅक्सीनद्वारे तयार अँटीबॉडी व्हायरसचे नवीन व्हेरिएंट्स बनवते. मात्र अद्याप अभ्यासातून सिद्ध झाले नाही.

ल्यूक यांनी म्हटले की, व्हॅक्सीन घेणार्‍यांमध्ये अँटीबॉडी डिपेंडंट एन्हँसमेंटच्या कारणामुळे व्हेरिएंटने संसर्ग आणखी मजबूत होईल.

सध्या मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशन करणे एक मोठी चुक आहे, एक वैद्यकीय चूक आहे. त्यांच्या वक्तव्यावर कांग यांनी ट्विट करून म्हटले की, त्यांचा हा दावा योग्य नाही. पुर्णपणे निराधार आहे.

डॉक्टर कांग यांनी म्हटले, जेव्हा आपण संक्रमित होतो किंवा जेव्हा व्हॅक्सीन घेतो तेव्हा आपल्या शरीरात संपूर्ण व्हायरस किंवा व्हायरसच्या भागाला उत्तर देण्यासाठी अँटीबॉडी तयार होते.

विषाणूच्या संसर्गात, शरीराचे अँटीबॉडीसह इम्यून रिस्पॉन्स वायरलची प्रतिकृती (रेप्लिकेशन) बनवण्यापासून रोखते आणि आपण संसर्गातून बरे होतो.

इम्यून सिस्टमला ट्रेनिंग देते!

व्हॅक्सीनेशनला ‘तयारी आणि प्रतिबंध’ म्हणत डॉक्टर कांग यांनी म्हटले की, आपली इम्यून रिस्पॉन्स व्हायरसची ताबडतोब लढण्यास सुरूवात करत नाही, तर ती इम्यून सिस्टमला व्हायरसला ओळखण्याचे ट्रेनिंग देते.

खुप कमी लोक इम्यूनोकॉम्प्रोमाईज्ड (कमजोर इम्यूनिटी) असतात. या लोकांमध्ये व्हायरस प्रतिकृती मोठ्या कालावधीपर्यंत राहू शकते, अशा दुर्मिळ प्रकरणात व्हेरिएंटचा विकास होऊ शकतो कारण ते इम्यून रिस्पॉन्सपासून वाचतात.

डॉ. कांग यांनी म्हटले व्हेरिएंट्स अनेक आहेत, परंतु इम्यूनिटीपासून वाचणारे व्हेरिएंट कमी आहेत. जसे की व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो.

काही व्हेरिएंट व्हॅक्सीनने तयार इम्यूनिटीपासून वाचण्यात जास्त सक्षम असतात. ते व्हॅक्सीनच्या प्रभावाला काही प्रमाणात कमी करतात.

कदाचित आपण वर्तमानात बी1.351 आणि बी1.617.2 च्या सोबत असेच पहात आहोत. मात्र, कतर आणि युकेच्या डेटानुसार व्हॅक्सीनचे दोन डोस जास्त सुरक्षा देतात व बचाव करतात हे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here