नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गाचा पुन्हा एकदा कहर सुरू झाला आहे. गेल्या चोवीस तासात रूग्ण संख्येत 26 हजार 291 ने वाढ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांची संख्यादेखील वाढून 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 इतकी झाली आहे. यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 7 हजार 352 इतकी असून 1 लाख 58 हजार 725 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
चालूवर्षीचा अर्थात 2021 मधील हा सर्वाधिक आकडा आहे. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील चालू वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली असून सक्रिय रुग्ण संख्या 2 लाख 19 हजार 262 वर गेली आहे.
गेल्या चोवीस तासात 17 हजार 455 रुग्ण बरे झाले असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. मृतांचा आकडा 118 ने वाढला आहे.
सक्रिय रुग्णांचा विचार केला तर केरळ, पंजाब आणि महाराष्ट्र या तीन राज्यात सर्वात जास्त रुग्ण सक्रिय आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांत इतर सहा राज्यातील लोक पुढे आहेत.
वाचा : आता बोंबलाचं ! १४ वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली चक्क ३ लेकरांची आई ! जत्रेत गेली पण परत आलीच नाही !
महाराष्ट्र, केरळ, पंजाबपाठोपाठ कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे संकट झपाट्याने वाढत आहे. दिल्लीत सलग चौथ्या दिवशी रूग्णसंख्येत चारशेपेक्षा जास्त वाढ झाली.
दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर 0.60 टक्के इतका आहे. दिल्लीतील मृतांची संख्या वाढून 10 हजार 941 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत नवीन रुग्ण संख्येत 419 ने भर पडली. याशिवाय 431 रुग्ण बरे झाले.
लसीकरणाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
कोरोनावरील लसीकरणाच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे.
शनिवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात 2 कोटी 97 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. यातील 2.41 कोटीचा पहिला डोस आहे तर उर्वरित दुसरे डोस आहेत.
अमेरिकेचा विचार केला तर या देशात आतापर्यंत 10.11 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. रविवारी 15 लाख 19 हजार 952 लोकांना लस देण्यात आली. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका, भारत, ब्रिटनपाठोपाठ ब्राझीलचा नंबर आहे.