Corona’s Growing Crisis in Maharashtra | राज्यात दोन दिवसात 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

171
coronavirus-cases-in-india-

मुंबई : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आले होते.

आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या मुंबईतील घरातील दोन जण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे.

  • कॅबिनेट मंत्री

  • जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त
  • अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
  •  धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
  • अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  • बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
  • सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) –  24 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस) – 22 सप्टेंबर –  कोरोनामुक्त
  • अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना) – 12 ऑक्टोबर – कोरोनामुक्त
  • अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी ) – 26 ऑक्टोबर 2020 – कोरोनामुक्त
  •  जयंत पाटील – जलसंपदा मंत्री – 18 फेब्रुवारी
  •  राजेश टोपे – आरोग्य मंत्री – 18 फेब्रुवारी
  • अनिल देशमुख – गृहमंत्री  –  5 फेब्रुवारी
  • राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री – 16 फेब्रुवारी
  • एकनाथ खडसे – माजी मंत्री – 18 फेब्रुवारी

 राज्यमंत्री

  • अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
  • संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
  • प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
  • सतेज पाटील – गृहराज्यमंत्री  (काँग्रेस) – 9 फेब्रुवारी 2021
  • बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री – 19 फेब्रुवारी 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here