कोरोनाचा हाहा:कार : लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी | दिवसभरात 16 हजार 620 नवे रुग्ण !

251
Coroana lockdown in maharasthra (1)

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे. 

या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे.

हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी

Pune: 2nd phase of lockdown from July 18-23

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय.

सोमवारपासून (15 मार्च) लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी तसे आदेश दिले आहेत. हा कर्फ्यु रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत असेल. तसेच येत्या 31 मार्चपर्यंत आठवडी बाजारदेखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेयत.

रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यु

CORONAVIRUS LATEST UPDATES | TOTAL COVID 19 CASES IN INDIA | CORONAVIRUS LOCKDOWN | CORONAVIRUS CASES IN INDIA STATE WISE MAHARASHTRA KERALA MUMBAI DELHI UTTAR PRADESH RAJASTHAN | The Financial Express

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. जारी केलेल्या आदेशाप्रमाणे लातूरमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या तीन किलोमिटरच्या त्रिज्येत रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदीचा आदेश लागू असेल.

तसेच 31 मार्चपर्यंत सर्व आठवडीबाजार बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान या भागात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तसेच या भागात धार्मिक विधींना केवळ पाच लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

  • लग्नकार्यासाठीसुद्धा 50 पेक्षा जास्त लोक जमल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने अशा कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.

  • लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 26927 वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत 25245 जण कोरोनामुक्त झाले आहेत. लातूरमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 716 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 962 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करुनही अनेक ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. हीच परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्येसुद्धा आहे. लातूर शहर तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.

येथील प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. आरोग्य यंत्रणेची तर झोप उडाली आहे. मात्र, येथे कोरोनाला थोपवण्यासाठी येथील यंत्रणेला म्हणावे तेवढे यश मिळत नाहीये.

या सर्व गोष्टी तसेच नागरिकांकडून नियमांचे होत असलेले उल्लंघन लक्षात घेता, येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. सावंत यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू

कोरोना संकट आणखी किती लोकांचा जीव घेईल? असा प्रश्न आता उद्भवतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत तब्बल 52 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर हा 2.28 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दिवसभरात 8 हजार 861 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात दिवसभरात 8 हजार 861 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 21 लाख 34 हजार 72 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.2 टक्के इतकं आहे.

राज्यात सध्या 5 लाख 83 हजार 713 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5 हजार 493 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 17 कोटी 51 लाख 16 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी 23 लाख 14 हजार 413 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मुंबईतही कोरोना रुग्ण वाढले

मुंबई शहरातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 1962 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तर दिवसभरात 1259 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 13940 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 11531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातही आकडा वाढताच

Pune: Two more weeks of Covid curbs, 'limited curfew' till March 14 | Cities News,The Indian Express

पुण्यात दिवसभरात 1740 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. पुण्यात दिवसभरात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

आतापर्यंत 4952 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 355 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सध्या 11590 रुग्ण सक्रीय आहेत.

मुंबई मध्ये नागरिकांच्या बेपर्वाईला आळा घालण्यासाठी थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. कारण वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता आयसीयू बेड,ऑक्सीजन बेड यांची जास्त गरज पडेल. पुढील पंधरवडा जास्त कसोटीचा आहे.

रेमीडिसिव्हरचा वापर लवकर करणे गरजेचे आहे. तसेच एसओपी व प्रोटोकाल तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलबजावणी करून कोरोनाला आला घालणे गरजेचे आहे. तसेच टेस्टिंग,ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट कडक केल्यास कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा बसेल असे डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला  सांगितले.

राज्यभरात कुठे किती रुग्ण? 

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 343962 318995 11535
पुणे 439562 405696 8144
ठाणे 293052 274816 5873
पालघर 49872 47852 939
रायगड 72974 69761 1613
रत्नागिरी 12336 11646 425
सिंधुदुर्ग 6777 6359 180
सातारा 60722 57120 1858
सांगली 51829 49294 1800
नाशिक 137449 128167 2093
अहमदनगर 79880 76380 1171
धुळे 18870 16902 337
जळगाव 69604 63098 1542
नंदूरबार 11448 10157 229
सोलापूर 59754 56379 1859
कोल्हापूर 50144 48056 1684
औरंगाबाद 59429 50987 1289
जालना 16713 15779 394
हिंगोली 5342 4497 100
परभणी 9332 7943 313
लातूर 26927 25245 716
उस्मानाबाद 18533 17413 576
बीड 20796 18513 577
नांदेड 26170 22710 692
अकोला 20302 16111 404
अमरावती 43318 38752 567
यवतमाळ 21989 18875 497
बुलडाणा 20865 17605 270
वाशिम 11352 10120 169
नागपूर 173547 152959 3584
वर्धा 16143 14254 325
भंडारा 14604 13711 315
गोंदिया 14858 14440 175
चंद्रपूर 25987 24485 422
गडचिरोली 9325 8994 103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 146 0 91
एकूण 2314413 2134072 52861

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here