मोदींना बदनाम करण्यासाठी कोरोनाचा व्हायरल हल्ला | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘चिनी हात’

419
Corona's viral attack to discredit Modi | 'Chinese hand' in second wave of corona

भाजपाचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांचा दावा

देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः थैमान घातलेलं पहायला मिळाले. केंद्र व राज्य सरकार आजही ही लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मागील दोन महिन्यात देशात कोरोना रुग्णसंख्येचा अक्षरशः विस्फोट झाला. त्याचबरोबर देशातील मृतांची आकडेवारीही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देश मागील एक वर्षांपासून ठप्प आहे. आजही मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे.

या दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे चीन असल्याचा दावा केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने चीनला आव्हान देत आहेत, आणि याचे प्रत्युत्तर म्हणून चीनने व्हायरल वॉर सुरू केले आहे.

मोदींची लोकप्रियता कमी करावी आणि सत्ताबद्दल करण्याचा कुटील डाव व आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे’, असे विधान भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदोर येथे बोलताना हे विधान केले आहे.

ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी विजयवर्गीय म्हणाले, करोनाची दुसरी लाट पसरली की, पसरवली गेली… हा चौकशीचा विषय आहे.

जगामध्ये कुणी चीनला आव्हान दिले असेल, तर ते भारताने आणि मोदींनी दिले आहे. हा चीनने केलेला व्हायरल हल्ला आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे, असे विजयवर्गीय म्हणाले.

भारताला संकटात टाकण्यासाठी चीनने हा व्हायरल हल्ला केला आहे, असे आम्हाला वाटते. कारण भारतातच करोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान वा अफगाणिस्तानात पसरलेली नाही.

चीनचा हा व्हायरल हल्ला भारताच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी केलेला कटाचा भाग आहे. अशावेळी आपण देशासोबत एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. आम्ही पक्षासाठी नाही, तर देशासाठी काम करत आहोत, असेही विजयवर्गीय म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. ऑक्सिजन संकट उद्भवलेले असताना पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांची आपण कल्पनाही करू शकत नाही.

नौदल, लष्कर आणि वायूदलाची मदत घेतली गेली. नौका, विमान आणि ट्रेनच्या मदतीने ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. सुरूवातीचे चार-पाच दिवस आपल्याला त्रास झाला. आम्हाला दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि तिच्या परिणामांविषयी माहिती नव्हती, असेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

राजनेता आता टेलीग्रामवर वाचता येईल. त्यासाठी (@RajnetaNews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here