Coronavirus Update लातूरात आकडा वाढला | राज्यात कोरोनाचे 25 हजारांहून अधिक रूग्ण वाढले !

207
Corona's fear increased | Corona breaks 2021 record in last 24 hours

मुंबई : कोरोनाची (Coronavirus) राज्यातही पुन्हा एकदा दहशत पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत होत आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 25 हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहे.

तर, सध्या राज्यात 1 कोटी 77 हजार 560 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केलीय. राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

तसंच नाट्यगृहं आणि सभागृहांमधली उपस्थितीही  50 टक्के ठेवावी, असे आदेशही देण्यात आलेत. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे  आणि सभांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशांमध्ये म्हटले आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २५ हजार ६८१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६२ करोना बाधित हे मुंबईत सापडले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरात दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लातूरात आकडा वाढला

लातूर जिल्ह्यात २४२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा २०० च्या वर गेलाय. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६२२ आहे.  तर २४ तासात कोरोनामुळे एकाने प्राण गमावलाय.

पुणे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ 

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासातं 2834 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 808 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. पुण्यात करोनाबाधीत २८ रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे

नांदेड येथे विक्रमी रुग्णसंख्या

नांदेडमध्ये कोरोनाची विक्रमी रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या – 24 तासात कोरोनाचे 697 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्नसंख्या 4170 वर गेली आहे तर  24 तासात 5 रुग्नांचा मृत्यु झाला आहे. नांदेडमध्ये 51 रुग्नांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here