कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरला नाही | नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा

629

नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हवालदिल आहे. दुसऱ्या लाटेतुन देश अजून सावरत नाही. तेव्हा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी धक्कादायक व खूप मोठे विधान केले आहे.

देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी कमी होत असली तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

त्यादृष्टीने देखील आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे, असे गडकरींनी सांगितल्याने सर्व यंत्रणा व सामान्य माणूस हादरून गेला आहे. कारण नितीन गडकरी उथळ बोलणारे नेते नाहीत. त्यांचा अभ्यास व वक्तव्य अतिशय गंभीरपणे घेतले जाते.

त्यांना चरणस्पर्श करतो

कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना साह्य करून परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावे लागते आहे.

आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू, असे ते म्हणाले.

24 तासात 895 कोरोना बळी

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 66358 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के आहे.

तर दुसरीकडे गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे.

राज्यातील कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

राज्यात सर्वाधिक मृत्यू झालेली ठिकाणं

पुणे पालिका – 117
ठाणे पालिका – 92
मुंबई पालिका – 78
औरंगाबाद – 80
नागपूर पालिका – 69
नंदुरबार – 43

गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्या

28 एप्रिल – 985
27 एप्रिल – 895
26 एप्रिल – 524
25 एप्रिल – 832
24 एप्रिल – 676

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here