कोलकाता : देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे खळबळजनक विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.
भारतात किमान चार रोटेटिंग राजधान्या असायला हव्यात. इंग्रजांनी कोलकाता येथे बसून संपूर्ण देशावर राज्य केलं. देशात एकच राजधानी का आहे?, असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.
फोडा आणि राज्य करा, याचा नेताजी नेहमी विरोध करायचे. बंगलाच्या भावना बाहेरील व्यक्ती समजून घेऊ शकत नाही. भाजप इतिहास बदलण्याचा विचार करत आहे.
नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन जातो. याउलट आज देशात नेत्यांच्या मनाला येईल तिकडे देश नेत आहेत, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
नवीन पीढीला नेताजींबाबत अधिक माहिती नाही. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले गेले पाहिजे. नेताजी आमच्यासाठी देशनायक आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.