Covid-19 Big News : ‘या’ जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून निर्बंध शिथिल होणार !

873

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे.

मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे 1 जून नंतर लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakrey) यांनी टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या जिल्ह्यात लॉकडाऊमध्ये काही सवलती देण्याचे संकेत दर्शवले आहेत.

त्यामुळे 31 मे नंतर राज्यातील कडक निर्बन्ध शिथिल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील असे सूचक संकेत दिले आहेत.

ते म्हणाले, जर बेड्‌सची संख्या 50 टक्‍क्‍यापेक्षा कमी असेल तर त्यावेळी निर्बंध कमी करण्याची पावले उचलली जातील. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

राज्याचे साथ रोग नियंत्रण अधिकारी प्रदीप आवटे म्हणाले, या पुढे महाराष्ट्रात संसर्ग दर कमी होत जाण्याची शक्‍यता आहे. सध्याचे निर्बंध हे केवळ ‘पॉज’ बटनसारखे आहेत. आपण दीर्घकाळ बंद ठेवल्यास एकत्रित हानी अधिक होण्याची भीती आहे.

संसर्ग कमी झाल्यावर आपण हळुवारपणे आणि काळजीपूर्वक व्यवहार खुले केले पाहिजेत, असे ते म्हणाल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाने दिले आहे.

• RajnetaNews टेलिग्राम जॉईन करा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here