कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी सरसावले

736
Rahul Kendre

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लातूर जिल्हा प्रभावित झाला असून लहा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

दररोज 1500 ते 2000 रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. या सर्व बाधित रुग्णांना आरोग्य संबंधित सोयीसुविधा उपलब्ध करून देताना प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड याची प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहान लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी संघटना व शिक्षक संघटनेची एक बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनेने एक दिवसाचे वेतन या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणुन निधी संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात जिल्हा परिषद वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन जवळपास 2 कोटी रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या जमलेल्या निधीतून कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करणे, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बाधित कर्मचाऱ्यावर वैद्यकिय उपचार करणे, तसेच या रोगाच्या प्रादुर्भावाने दुर्दैवाने मृत झालेल्या जि.प.कर्मचाऱ्यांच्या कुंटूबियास मदत करणे या कामी हा निधी वापरण्यात येणार आहे.

यापुर्वीही लातूर जि.प.कर्मचाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी व कुपोषणग्रस्तासाठीही 1 दिवसाचे वेतन मदत म्हणून देऊ केलेली आहे. काल झालेल्या या बैठकीला जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here