महाराष्ट्रात कोव्हिड 19 च्या दुसऱ्या लाटेला सुरुवात : केंद्र सरकारची ‘घोषणा’

174
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

महाराष्ट्राची नुकतेच केंद्र सरकारचे पथक पाहणी करुन गेले होते. आता सध्या देशामधे सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या आणि कोरोना मृत्यूची संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, अलगीकरण, विलगीकरण आणि चाचण्या यांत फार कमी कार्यक्षम प्रयत्न केले जात आहेत, अशी खंत आरोग्य सचिवांनी मुख्यसचिवांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

केंद्रीय टीमच्या पाहणीनुसार महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासन फारसे काळजीत दिसत नाही.

खूप उपाययोजना आधीच केल्या आहेत असा विचार केला जात आहे. या बेफिकिरीमुळे व उदासीनतेमुळेच पुढे त्रास होऊ शकतो, असा सक्त इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणांने दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्रात कोव्हिड 19च्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालेली आहे.

रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीत.

ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोव्हिड 19 पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत.

कोव्हिडचा हा प्रसार रोखण्यासाठी वा थांबवण्यासाठी ऑगस्ट – सप्टेंबर 2020 प्रमाणे प्रशासकीय यंत्रणा सक्रीय करण्यात यावी, असा केंद्रीय पथकाचा निष्कर्ष आहे.

यापुढच्या सूचनांमध्ये उल्लेख करण्यात आलेले सगळे महत्त्वाचे भाग आणि त्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना यांचं कठोरपणे पालन करण्यात यावे.

सोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि गृह विभागाने कोव्हिड 19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि वेळोवेळी सांगण्यात येणारी मार्गदर्शक तत्वं यांचंही पालन संसर्ग रोखण्यासाठी करण्यात यावं, असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सूचना

-होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा.

-टेस्ट पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी करा

-प्रत्येक पॉझिटीव्ह रूग्णाचे 20-30 contact टेस करा

-कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा

-राज्यातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत.

-नाईट कर्फ्यू आणि विकएंड लॉकडाऊन केल्याचा फार कमी परिणाम संसर्ग रोकण्यासाठी होतो

-मुंबईत टेस्ट पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्के तर औरंगाबादमघ्ये 30 टक्के

-फिल्ड स्टाफला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समजलं नाही. हे कुटुंब आणि शेजाऱ्यापुरते मर्यादीत राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here