-
जिल्ह्यातील 3 ऑक्सिजन पुरवठा प्लाँन्टला प्रत्यक्ष भेट
-
सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच वापरावे
-
ऑक्सिजनचा पुरवठा पुर्ण क्षमतेने करावे
लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना बाधित रुग्णांस पुरवठा करण्यात येत असलेल्या ऑक्सिजन बाबतची आढावा बैठक घेऊन संबधितांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित उदगीर व जळकोट तालुक्यातील ऑक्सिजन तुटवडा संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, उदगीर व जळकोट तालुक्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकडे आपले जातीने लक्ष असून कोणालाही ऑक्सिजन कमी पडणार नाही. उदगीर तालुक्यातील कोरोना बाधित लोकांनी धीर सोडू नये, आपण कायम सोबत आहोत.
या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेटी, तहसिलदार रामेश्वर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हरीदास, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, बस्वराज पाटील नागराळकर, ऑक्सिजन प्लाँन्टचे उत्पादक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक करताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.
कोरोना बाधित रुग्णास पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. त्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात विजया, शारदा व नाना एजंसी मार्फत ऑक्सिजन पुरवठा होत आहे. आज राज्यमंत्री बनसोडे यांनी या आक्सिजन पुरवठा प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्यांना प्रोत्साहीत केले व सविस्तर चर्चा करुन या तिन्ही एजंसी मार्फत उत्पादित केलेली ऑक्सिजन हे जिल्ह्यात वैद्यकीय उपचारासाठीच वापरावे असे प्रशासनाला सुचित केले.
या सोबत जिल्हयातील तिन्हीही ऑक्सिजन पुरवठा उत्पादकांनी पुर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन त्यांनी केले.
राज्यमंत्री श्री.संजय बनसोडे यांनी जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शन बाबत सविस्तर चर्चा करुन रेमडिसीवीर इंजेक्शन वितरणासाठी जिल्हास्तरीय एजंसी नेमण्याबाबत कार्यवाही करावी असे सूचित केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.