Covid Test at Home | घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी, होम टेस्टिंग किटला ICMR ची मंजुरी

453
Corona tests

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व आरोग्य यंत्रणा कमालीच्या तणावात होती. डॉक्टर, प्रयोगशाळा व आरोग्य कर्मचारी सतत धावपळ करीत आहेत.

कोरोना टेस्ट करण्याच्या प्रचलित पध्दतीत अनेकदा खूप वेळ लागत होता. मात्र आता नवीन पद्धतीने तपासणी केली तर घरच्याघरी बसून तपासणी व रिपोर्ट मिळणार आहे.

कोरोना टेस्ट (Corona Test) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) वापरली जाते.

आरटी-पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) की विविध ठिकाणी जाऊन केली जाते. ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते.

या दोन्ही तपासण्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत, आणि रिपोर्ट वेळेवर मिळत नाही अशी तक्रार होती. त्यामुळेच आता नव्या तंत्रज्ञानामुळे तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोनाची टेस्ट करू शकणार आहात.

कोरोनाच्या संकटात नागरिकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे.

COVISELF (Pathocatch) असे या किटचे नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट (My Lab Discovery Solution Ltd.) तयार करण्यात आली आहे. या किटमार्फत लोक आपल्या नाकातील स्वॅब सॅम्पल घेऊन आपली चाचणी करू शकतील.

आयसीएमआरने कोरोना टेस्टबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लोक घरीसुद्धा अँटिजेन टेस्ट करू शकतात. ही होम टेस्टिंग फक्त अशा लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांसाठी आहे, जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत.

स्वतःची कोरोना टेस्ट अशी करा !

होम टेस्टिंगसाठी COVISELF किट आणि मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचे आहे.

त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.

ज्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा.

हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल.

मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

या टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानले जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही असे आयसीएमआरने सांगितले आहे.

त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करावे लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानले जाईल आणि आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये रहावे लागेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here