कोरोनाने शहरी व ग्रामीण भागात हाहाकार उडविला आहे. तेव्हा अनेकांच्या मनात ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरबद्दल अनेक गैरसमज आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने फुफ्फुसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
तेव्हा कोरोनाच्या रुग्णाने स्पर्श केलेले ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर दुसऱ्या व्यक्तीला वापरता येते का?
हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याबद्दल तज्ञानी दिलेली माहिती जाणून घेऊया !
हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याबद्दल तज्ञानी दिलेली माहिती जाणून घेऊया !
- शरारीतील ऑक्सिजनची पातळी व शरीराचे तापमान तपासण्यासाठी ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर वापरेल जाते.
- करोनाबाधित रुग्णाने वापरलेले ऑक्सिमीटर योग्य पद्धतीने स्वच्छ करून त्याचा पुन्हा उपयोग केला जाऊ शकतो. पण हे उपकरण योग्यरित्या स्वच्छ होणे अत्यंत गरजेचे आहे.
- याशिवाय ऑक्सिमीटर वापरल्यानंतर आपले हात पाणी आणि साबणाने अथवा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुऊन घेतले पाहिजे.
- दरम्यान एकाच थर्मामीटरचा एकाच वेळेस अनेकांनी वापर करणे टाळावे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
- एकच थर्मामीटर एकापेक्षा अधिक लोकांनी वापरणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून अजिबात सुरक्षित ठरू शकत नाही.
- घरातील प्रत्येक व्यक्तीचे थर्मामीटर स्वतंत्रच असणे अत्यंत गरजेचे आहे, हे कायम लक्षात ठेवा.
- ऑक्सिमीटर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर किंवा साबण आणि ओल्या कापडाच्या मदतीने स्वच्छ करू शकता.
- पारा (Mercury) असलेले थर्मामीटर असेल तर ते कोमट साबणाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावे.