Covid Update News : कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज!

520

कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो.

कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या विषयी निर्णय जाहीर होऊ शकतो.

कोवॅक्सिनचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश

भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीचा समावेश जागतिक आरोग्य संघटेनेनं त्यांच्या यादीमध्ये करावा, यासाठी अर्ज केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून यावर जुलै ते सप्टेंबर दरम्यान निर्णय घेतला जाऊ शकतो. अमेरिका, ब्राझील, हंगेरी यासह एकूण 60 देशांमध्ये कोवॅक्सिन लसीला मान्यता मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणू संसर्गानंतर परदेशात प्रवास करायचा असल्यास लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसींची यादी तयार केलेली आहे.

मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिन लसीचा समावेश नसल्याने ती लस घेतलेल्यांपुढे अडचण निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here