कोटा जिल्ह्यातल्या सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे.
१५ वर्षीय मुलीवर १२ हून अधिक जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
नराधमांनी नऊ दिवस मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४ अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश आहे.
नराधम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना ती विव्हळत होती, जिवाच्या आकांताने ओरडत होती. त्यावेळी तिला शांत करण्यासाठी नराधम अमली पदार्थ द्यायचे.
याशिवाय तिला मारहाण करायचे. मला घरी जाऊ द्या, अशी विनंती पीडित तरुणीनं नराधमांकडे वारंवार केली.
तिला चाकू दाखवून धमकावले
कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडला.
आरोपी चौथमल, बुलबुल उर्फ पूजा जैन पीडितेला बॅग देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून शेजारच्या झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले.
त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावले आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवले. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आले.
त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेले गेले. तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले, अशी माहिती चौधरींनी दिली.