आरोपीच्या १६ गर्लफ्रेंड असून त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या कारची चोरी करत होता, असा पोलिसांचा दावा केला आहे.
प्रेमात पडल्यावर अनेकदा माणूस वहावत जातो, हे खरे असले तरी चक्क आपल्या आपल्या सोळा गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी त्याने महागड्या गाड्यांची चोरी केली मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आला सापडला.
हरियाणातील फरीदाबाद येथील बातमी असून या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या १६ गर्लफ्रेंड्स असून आरोपीने आपल्या गर्लफ्रेंड्सची हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या गाड्यांची चोरी केली आहे.
देशातील विविध राज्यातून ५० हून अधिक महागड्या गाड्या त्याने चोरल्या होत्या. फरीदाबादमधील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन आता हिसारमध्ये राहत नाही. तर तो बाहेरील राज्यांमध्ये राहतो. आरोपी फक्त लक्झरी कारची चोरी करत होता.
पकडल्यावर तो आपला पत्ता सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचा सांगत होता. त्याने हिसारमध्ये अनेक महागड्या कारची चोरी केली आहे. आपण मैत्रीची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याचेही त्याने कबूल केले आहे.
आरोपी रॉबिनने पोलिसांचीही अनेकदा दिशाभूल केली आहे. त्याने प्रत्येकवेळी कार चोरीच्या घटना बदलल्या आहेत. हिसार वगळता एनसीआरसह देशातील इतर राज्यांमधून लक्झरी कारची चोरी केली आहे.
लक्झरी कारची चोरी करण्याऱ्या या चोरट्याला हिसारमधील जवाहरनगरमध्ये रॉबिन, राहुल, हेमंत आणि जॉनी या नावाने ओळखले जाते.
हिसारमध्ये त्याने पोलिसांना जवळपास आपल्या १५ ते २० वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते लिहिलेले आहेत. आरोपीला एक वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
त्यानंतर तो अलिकडेच तुरूंगातून बाहेर आला आणि पुन्हा कार चोरी करण्यास सुरवात केली. ३१ ऑगस्ट रोजी त्याने सेक्टर -२८ फरीदाबादमध्ये घराबाहेर पार्क केलेल्या फॉर्च्युनर कारची चोरी केली होती.
त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरण छडा लावला. आरोपीने गाझियाबाद, जोधपूर येथील फॉर्च्युनर आणि गुरुग्राममधून जीप चोरल्याची कबुलीही दिली आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेने तेथील पोलिसांना कळविले आहे.