Crime News | अजय देवगणचा दृश्यम पाहून प्रेयसीची केली हत्या

221
Crime Love News

अजय देवगण,तब्बू आणि श्रिया सरन यांचा थ्रिलर चित्रपट दृश्यम 2015 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता.आजही अनेक रिकाॅर्ड आजही या चित्रपटाच्या नावावर आहेत. 

मात्र, त्यावेळेला कोणाही विचार केला नसेल की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर साडेपाच वर्षांनंतर कोणी चित्रपट पाहून एखादी हत्या करेल. एका तरुणाने हा प्रयत्न करून पाहिला मात्र तो धरला गेला. 

14 जानेवारीला बोइसर पोलिसांनी 34 वर्षीय सूरज यास अटक केली होती. सुरजने अमिता नामक प्रेयसीची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हत्या केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, सूरज आणि अमिता 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे हे नाते अमिताच्या घरातील लोकांनी स्वीकारले देखील होते.

21 ऑक्टोबरला दोघे लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते, परंतु अमिता परत घरी आली नाही किंवा तिचा संपर्कही होऊ शकला नाही. यानंतर अमिताच्या घरच्यांना सूरजने मेसेज करून सांगितले की, आम्ही लग्न केले आणि आम्ही तातडीने वापीला (गुजरात ) शिफ्ट झालो आहोत.

काही दिवसांनंतर पुन्हा आमिताच्या कुटुंबीयांनी सूरजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही. आमिताच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
गेल्या आठवड्यात अमिताच्या भावाने सूरजला बोइसरमध्ये पकडले मात्र, सूरज तेथून निघून गेला त्यानंतर त्याच्यावरचा संशय बळावत गेला आणि पोलिसांनी पुन्हा सूरजला पकडले. मग सर्व सत्य समोर आले आणि सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्काच बसला.
अमितासोबत लग्न करायचे नसल्याचे सूरजने सांगितले पण ती वारंवार त्याच्यावर दबाव आणत होती. अमिताच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या सूरजने अमिताचा गळा बेल्टने आवळून हत्या केली.
तिचे शरीर प्लास्टिकमध्ये झाकले आणि तिचा मृतदेह भिंतीत लपून टाकला. सूरजने पोलिसांना सांगितले की, ही कल्पना ‘दृश्यम’ चित्रपटामधून त्याला मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here