नागपूर मध्ये दोन दिवसांपूर्वी एका लॉजवर मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.
तरुणाला बांधलेले असताना खुर्ची पडून त्याला फास बसला आणि तरुणाचा मृत्यू झाला, अशी बातमी आजवर मीडियात फिरत होती. त्यावर अतिशय उथळ आणि बीभत्स प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटत होत्या.
मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून पॉर्न व्हिडीओ क्लिपच्या आड खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मृतक तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर 8 जानेवारी रोजी ही घटना घडली होती मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर होता.
हा तरुण विवाहित होता. दोन वर्षांपासून त्याचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना देखील माहित होते.
सदर तरुण हा गुरुवारी दुपारी छोट्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे जाणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते मात्र त्याला तरुणीचा फोन आला होता.
त्यानंतर तो कामानिमित्ताने सावनेरला जात असल्याचे त्याने घरी सांगितले मात्र संध्याकाळ झाली तो परतला नाही. फोन केल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर रात्री 10 वाजता त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीमुळे आता प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
मृत तरुण आणि तरुणीने शुक्रवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होते. दोघांनी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या लॉजवरील एक खोली बुक केली होती.
लॉजमध्ये गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहून त्यात दाखवल्याप्रमाणे त्यांनी दोरीचा वापर केला होता.
तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले आणि त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा आवळण्यात आली होती.
या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली मात्र तो तरुण तश्याच दोरी बांधलेल्या अवस्थेत होता,अशातच खुर्ची खाली कोसळली आणि त्याच्या गळ्याला फास बसला.
प्रेयसी जेव्हा बाथरूमच्या बाहेर आली तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली.
त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
आता या प्रकरण मृतक तरुणाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पुढील तपास पोलीस करीत असले तरी सोशल मीडियातून अतिशय बीभत्स प्रतिक्रिया क्मेंटचा पाउस पडला.