अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जतेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.