प्रेयसीला अटक केली असुन नववुधला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bihar शेखापूर : प्रेमात फसवणुक झाल्यास प्रियकर किंवा प्रेयसी आपल्या जोडीदाराला धडा शिकवण्यासाठी वेगवेगळे कारनामे करतात. कधी शाब्दीक भांडणातून तर कधी कधी एकमेकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून राग व्यक्त केला जातो.
मात्र, बिहारच्या एका प्रेयसीने प्रेमात आपली फसवणूक (girlfriend attack bride of boyfriend) झाली असता केलेला प्रकार पाहून सर्वांच्याच धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकराने दुसऱ्या एका मुलीशी लग्न करून संसार थाटलाय हे समजताच फसवणुकीची शिक्षा प्रियकराच्या घरी जावून नव्या नवरीला दिली.
नेमके काय केले?
संतापलेली प्रेयसी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिने झोपेत असलेल्या नववधूचे केस कापले व फेविक्विकने तिचे डोळे चिकटवले. त्यानंतर नवरीला जबर मारहाण केली. प्रेयेसीचे हे भयंकर कृत्य पाहून सर्वजण आवाक् झाले.
मुलीचे भयंकर रूप पाहता नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात फोन करत तिला पकडून ठेवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चौकशी सुरु केली.
आरोपी मुलगी आणि नवरदेवाचे प्रेम प्रकरण सुरु होते. पण त्याने एक डिसेंबर रोजी शेखपुरा जिल्ह्यात दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. हे समजताच संतापून तिने हे कृत्य केले असल्याचे समोर आले.