Crime News | मुकबधिर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या, एकजण अटकेत

202
kidnap

बिलोली / नांदेड :  एका 27 वर्षीय अविवाहित मूकबधिर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिलोली शहरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस बुधवारी (दि. 9) मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा विविध स्तरातून निषेध होत असून या प्रकरणातील नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली मयत मूकबधिर तरुणी आपल्या बहिणीकडे शहरातील झोपडपट्टी (नवीन आबादी) भागात राहत होती. मयत तरुणीची बहीण मोलमजुरी करून तीचा सांभाळ करत होती.

दि.9 डिसेंबर रोजी बहीण नित्यनियमांप्रमाणे मोलमजुरीस गेली होती. सायंकाळी कामाहून परतल्यानंतर मूकबधिर बहीण घरी नसल्याने शोधाशोध सुरू केली; परंतु झोपडपट्टीलगत असलेल्या जि.प.शाळेच्या पाठीमागे शौचास गेल्यानंतर सदर बहिणीवर काही नराधमांनी बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून केल्याचे आढळून आले.

शेजाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलीसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द केला.

याप्रकरणी मयत तरुणीचा चुलत भाऊ दयानंद विठ्ठल कुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे करीत आहेत.

सहायक पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व समाजबांधवांनी घेतला. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री सहा.पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी श्वान पथकाच्या साहाय्याने बिलोली येथील एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले.

सदर मृतदेहावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी (दि. 10) मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here