Crime News फॉर्च्युनरचा सौदा मोडला | 14 लाख 20 हजारांचा फटका दिला, पोलिसात तक्रार दाखल

162
Fraud Crime News

फॉर्च्युनर कार एका व्यक्तीला विकण्याचा सौदा करून त्यापोटी 14 लाख 20 हजार रुपये घेऊन कार दुसऱ्याच व्यक्तीला विकली. 

याबाबत कार विक्री करणा-यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना वाकड येथील मोरया कार्स या दुकानात घडली. रवींद्र काशिनाथ काकडे (वय 49, रा. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विलास देवकर (रा. संतोष नगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास देवकर याचे वाकड येथे मोरया कार्स नावाचे कारचे दुकान आहे.

आरोपीने फिर्यादी काकडे यांना फॉर्च्युनर कार (एम एच 14 / इ क्यू 0303) विकण्याचा सौदा केला. त्यापोटी आरोपीने काकडे यांच्याकडून 14 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने फॉर्च्युनर कार परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली.

फसवणूक झाल्याने काकडे आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने काकडे यांना शिवीगाळ करून त्यांच्या मुलाचे आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी दिली, वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here