Crime News | नराधम आरोग्य अधिकाऱ्याने असहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग!

226
rape-victim-girl-fear-cries-rapist-shut

औरंगाबाद : येथे नराधम आरोग्य अधिकाऱ्याने असहाय विधवा महिलेवर पाच वर्षापासून लैंगिक अत्याचार केले. या नराधम डॉक्टरला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली.

आरोपी डॉक्टर हा जिल्हा परिषदेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहे. डॉ. प्रदीप काशीनाथ जाईबहार (रा. श्रीनिकेतन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पिडीतेच्या पतीचे सात वर्षापूर्वी निधन झाले. तो तिच्या ओळखीचा असल्यामुळे घरातील लहान मोठ्या कामासाठी ती त्याची मदत घेत.

२०१५ मध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवशी रात्री पिडितेची मुले मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर गेली होती. तेव्हा पिडीता घरी एकटी असल्याची संधी साधून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या जाईबहारने तिच्यावर प्रथम बलात्कार केला.

हा प्रकार कुणाला सांगितला तर बदनामी करीन अशी धमकी देउन तो निघून गेला. यानंतर सलग पाच वर्षापासून तो तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत होता.

दरम्यान त्याने पिडितेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने तक्रारदार यांना सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने २ डिसेंबर रोजी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या अत्याचाराची माहिती दिली.

पोलिसांनी रात्री उशीरा तिची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जी. पी. सोनटक्के यांनी अवघ्या काही तासांत आरोपी प्रदीप ला बेड्या ठोकल्या.

आरोपी प्रदीपला एलसीबीने केली होती अटक

आरोपी डॉ. प्रदीप जाईबहार याला लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. यामुळे सुमारे वर्षभर तो निलंबित होता.

दरम्यान त्याचे निलंबन रद्द करून तो जिल्हा परिषदेते पुन्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाला होता. दरम्यान आता पुन्हा त्याला बलात्कार आणि विनयभंगाच्या गुंह्यात त्याला अटक झाल्यामुळे पुन्हा त्याला निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here