Crime News | पतीने पत्नीच्या गुप्तांगात रॉड घालून जखमी केले

168
kidnap

एका नराधम पतीने माहेरहून पैसे आणत नाही म्हणून आपल्याच पत्नीच्या गुप्तांगात रॉड घालून तिला जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या घटनेतील पीडितेच्या लग्नानंतर काही महिन्यात लगेचच सासरच्या लोकांनी सुनेचा पैशासाठी छळ सुरू केला होता. त्याशिवाय पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग करून तिच्या गुप्तांगात केबल रॉड घालून जखमी केलं.
 
हा धक्कादायक प्रकार पुण्यातील बोपोडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इम्तियाज चौधरी, सईद चौधरी, अश्फाक चौधरी, जाकीर चौधरी, मकायश चौधरी, शमशुद्दीन ( सर्व रा. खडकी )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
 

याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here