Crime News | अनैतिक संबंधात पतीचा अडथळा; पत्नीने काढला काटा !

175

बेळगाव : महाद्वार रोड येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून अपहरण करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

सागर गंगाप्पा पुजेरी (वय 23, रा. सोमनट्टी ता. जि. बेळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यात त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. मार्केट पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी अधिक तपास करीत आहेत.

बाळप्पा भगवंतप्पा दिन्‍नी (रा कोळ्यानट्टी) बसवराज यल्‍लाप्पा उप्पार (रा. कोळ्यानट्टी), मंजुनाथ पिराप्पा बीडी (रा. संपगांव), निलम्मा सागर पुजारी (रा. सोमनहट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बातमी वाचा : माणुसकी शरमली | मुलासमोर ठेचून पत्नीचा खून, पती पसार

सागर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता कामावर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. तो शहरातील महाद्वार रोडवरील चोण्णद स्टील इंडस्ट्रीजमध्ये काम करत होता.

दुपारी 2 च्या सुमारास तो खानापूरला जाऊन येतो, असे दुकानात सांगून गेला. तो घरी परतलाच नाही. तशी फिर्याद त्याचे वडील गंगाप्पा यल्लाप्पा पुजेरी यांनी मार्केट पोलिसात दिली होती. या प्रकरणामुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here