Crime News : काकीसोबतचे अनैतिक संबंध बेतले जीवावर | काकीने घरातील नोकरासोबत मिळून केली ‘त्याची’ हत्या

198
Girlfriend calls her boyfriend home and launches 'Acid Attack'

झारखंडमधील एका हत्येमागील खुलासा झाल्याचा दावा येथील पोलिसांनी केला आहे. पत्रकार अनिल मिश्रा यांचे पुत्र संकेत मिश्रा यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी मोठी माहिती समोर आणली आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, मृत संकेत मिश्रा यांचे आपल्या काकीसोबत अवैध संबंध होते. 33 वर्षीय काकीनेच घरातील नोकरासोबत मिळून त्याची हत्या केली. याच काकीचे घरातील नोकरासोबतही अवैध संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संकेत मिश्राने काकीकडून 3000 रुपयांची मागणी केली होती त्यानंतर आरोपी काकीने प्रेमघाग पिकनिकच्या ठिकाणी त्याला बोलावले होते.

यादरम्यान घरातील नोकर बिरसा काही सामान आणण्यासाठी गेला, त्यावेळी एका गोष्टीवरुन संकेत याचा त्याच्या काकीसोबत वाद झाला.

यादरम्यान नोकर बिसरादेखील घटनास्थळी आला आणि त्याने संधी पाहून संकेत मिश्रा याच्यावर हल्ला केला आणि संकेत याचा खून केला त्यानंतर नोकर बिरसाने स्वत: घाललेली जीन्स आणि जॅकेट काढून पेट्रोलमध्ये भिजवलं आणि मृतदेह जाळून हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तपास सुरु असताना मृतकाच्या मोबाइलवर त्याच्या काकीनेच अनेकदा फोन केले असल्याची माहिती पुढे आली. दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा तासनतास गप्पा होत असल्याने प्रकरणातील गूढ वाढले.

पोलिसांनी मृतकाच्या काकीला पोलीस ठाण्यात बोलावले मात्र काकी पोलीस स्टेशनला न जाता बिरसासोबत शेजारीला राज्य छत्तीसगडमध्ये पळाली. मात्र पोलिसांनी कारवाई करत छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, या घटनेचं गांभीर्य पाहता एसडीपीओ तोरपा ओम प्रकाश तिवारी यांच्या नेतृत्वात 8 सदस्यीय एसआयटी टीमचं गठण करण्यात आले.

पोलिसांनी सर्व केस गांभीर्याने पाहिली असून मुख्य आरोपी मृत व्यक्तीची काकी आहे. तिला छत्तीसगडमधील जसपूर येथून अटक करण्यात आली आहे.

दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याशिवाय आरोपींकडून दोन मोबाइल आणि मोटरसायकलदेखील जप्त करण्यात आले आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी अनिल मिश्रा याच्या घरी पोहोचून सांत्वन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here