मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी प्रीती जैन नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. चौकशीमध्ये तिने जे धक्कादायक खुलासे केले आहेत ते ऐकून चक्क पोलिसांचंही डोकं गरगरायला लागलं आहे.
हे प्रकरण इतकं वाढत गेलं की अखेर शिवराज सिंह चौहान यांना तातडीची बैठक बोलवावी लागली. ही प्रीती जैन अवघ्या 5 वर्षांपूर्वी पुण्याहून इंदूर इथे स्थायिक झाली होती.
5 वर्षांत प्रीती जैन कोट्याधीश झाली असून तिने तिथल्या व्हीव्हीआयपी भागात एक आलिशान बंगलाही विकत घेतला आहे. त्यामुळे आता याची पाळमूळ कुठवर जातात याची उत्सुकता पोलिसांना आहे.
ड्रगवाली आंटी नावा मागचे रहस्य काय?
प्रीती जैन हिला ड्रगवाली आंटी हे नाव कसं पडलं याचा खुलासा तिच्या चौकशीदरम्यानच झाला. तिने शहरातील सगळ्या मोठ्या पबमध्ये वेगवेगळ्या नावाने सदस्यता घेतली होती.
या सगळ्या पबमध्ये जाऊन प्रीती तरुणी हेरायची आणि त्यांना ड्रग्ज विकायची. या तरुणी तिला आंटी म्हणून बोलवायच्या आणि तिथपासून ती ड्रगवाली आंटी म्हणूनच ओळखली जाऊ लागली.
नवी गिऱ्हाईके शोधण्यासाठी प्रीती ही रोज वेगवेगळ्या पबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत असायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
15 जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक
दिल्ली, मुंबई आणि गोव्यातही आंटीचे ‘नेटवर्क’
या आंटीच्या किमान 200 तरुणी या ग्राहक आहेत. पब आणि हॉस्टेलमध्ये जात प्रीती जैनने या मुलींना नादावलं होतं. तिने या तरुणींना एमडी आणि कोकेनच्या नशेची सवय लावली होती.
तिने नवऱ्याच्या आणि मुलाच्या मदतीने दिल्ली, मुंबई आणि गोव्यामध्ये आपलं जाळं उभं केलं होतं. प्रीती जैनचा देहव्यापारामध्येही हात असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या आंटीकडे एकूण 4 मोबाईल होते ज्यातील 2 मोबाईल पोलिसांच्या हाती लागले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना कळालं आहे की ही प्रीती आंटी ब्राझील आणि नायजेरियाच्या तस्करांकडून ड्रग्ज विकत घेत होती.
कारण तिचे सँडो नावाच्या एका आरोपीसोबतचे संबंध उघड झाले असून सँडो हा देहव्यापारातील कुख्यात नाव आहे. पोलिसांनी प्रीती जैन हिला न्यायालयासमोर हजर केलं असता तिला 18 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.